बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनामुळे राज्यातील एकपडदा चित्रपटगृहे बंद असल्याने चित्रपटगृहे चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, कर्नाटक राज्य चित्रपट प्रदर्शक संघटनेने (केएसएफईए) मालमता कर माफ करण्यासंदर्भात सविस्तर निवेदन मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांना दिले होते. यांनतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी सिंगल-स्क्रीन थिएटरवरील (एकपडदा चित्रपटगृह) मालमत्ता कर माफ करण्याचा आदेश जारी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
आदेशानुसार, एकपडदा चित्रपटगृहासाठी मालमत्ता कर माफ करण्यासाठी राज्य तिजोरीतील ९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. केएसएफईएने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, की कोरोना महामारीमुळे चित्रपटगृहे गेल्या वर्षी मार्चपासून जवळजवळ १४ महिने बंद असल्याने चित्रपटगृह मालकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, राज्यात ६३० एकल-स्क्रीन थिएटर आहेत.