प्रतिनिधी/ चिपळूण
साहेब, वर्षानुवर्ष काडी-काडी जमा करून संसार उभा केल़ा मात्र या पुरात तो उद्ध्वस्त झाल़ा तुम्ही काहीही करा…आमदार-खासदारांचे पगार वाढवा आणि आम्हांला मदत कऱा आम्हांला मदत केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका, असा टाहो येथील पूरग्रस्तांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर फोडल़ा
रविवारी सकाळी गुहागर-अंजनवेल येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. त्यांचा ताफा दुपारी 1 वाजता चिपळूण नगरीत पोहोचला. यानंतर भेंडीनाका नाथ प़ै चौक जुना बसस्थानक चिंचनाका आदी विविध ठिकाणी पूरग्रस्त व्यापाऱयांनी ताफा अडवला. यावेळी गाडीबाहेर आलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर नागरिकांनी आपली कैफियत मांडल़ी मुख्यमंत्र्यांची व्यापाऱयांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने टाहो फोडला. ती महिला खूपच रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं…ते सर्व गेलं. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठय़ाने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिले. यावेळी पूरग्रस्तांनी स्थानिक प्रशासनासमोर प्रचंड संताप व्यक्त केल़ा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी 1 वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत आले. गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेत त्यांना धीर दिला. आणि परिस्थितीची अचूक माहिती जाणून घेतली व चर्चाही केली. उपस्थित व्यापाऱयांनी डोळय़ात पाणी आणून व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
या तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱयांना दिलासा दिला. यावेळी एका महिलेने आम्हांला आश्वासन नको, मदत हवी आह़े आम्हांला सोडून जाऊ नका, आम्हांला मदत करा, असा टाहो फोडल़ा यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही दुकानदारांच्या भेटी घेतल्य़ा त्यांच्याशी चर्चा केल़ी यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्य़ांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या व्यथा मांडल्य़ा यावेळी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होत़ी यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.