प्रतिनिधी / इचलकरंजी
इस्लामपूरच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार – पवार यांना एका नगरसेवकाने धमकी दिल्याचा प्रकार नुकताच घडला. याबाबत इचलकरंजी येथील समाजमाध्यमांतून तीव्र प्रितिक्रिया उमटत असून काही वर्षापुर्वी इचलकरंजी पालिकेतील त्यांच्या कामाची पध्दत पाहिलेले अधिकारी, कर्मचारी व नागरिकातूनही या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. इस्लामपूर नगरपालिकेच्या घंटागाडीतून दारूची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केल्यामुळे एका स्वीकृत नगरसेवकाने मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या दालनात जावून शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिल्याचे वृत्त बुधवारी इचलकरंजी शहरात पसरले. प्रज्ञा पोतदार या इचलकरंजी नगरपालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी म्हणून दोन वर्षे कार्यरत होत्या. त्यांच्या लोकाभिमूख कामाची पध्दत अजूनही येथील नागरिकांच्या विस्मरणात गेली नाही. इचलकरंजी शहर पुर्णपणे होर्डिंग्जमुक्त करण्यासाठी त्यांनी उचलेले धाडसी पाऊल तसेच स्वत: रस्त्यावर उतरून कर्मचाऱ्यांपुढे राहून केले
अतिक्रमण निर्मूलनाची कामे नागरिकांनी स्वत: पाहिली आहेत. त्यांच्यामुळे इचलकरंजी हे जिल्ह्यातील एकमेव होर्डिंगमुक्त शहर बनले आहे. सफाई कामगारापासून पालिकेच्या विविध अधिकारी वर्गाला विश्वासात घेवून काम करण्याची त्यांच्या पद्धतीबरोबरच सामान्य नागरीकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठीची त्यांची तत्परता आजही इचलकरंजीकरांच्या लक्षात आहे. अशा या कर्तव्यतत्पर अधिकार्यांला एका नगरसेवकाने दिलेल्या धमकीचे वृत्त इचलकरंजीत समजताच सोशल मिडियामध्ये याबाबत निषेधाचा सूर उमटू लागला आहे. अनेक नागरिकांसह पालिकेचे अधिकारी, सामाजिक व राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांमध्येही संतप्त चर्चा सुरु असल्याचे दिसून येत आह