मागील आठवडय़ातील सेन्सेक्समधील कंपन्यांची कामगिरी
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील आठवडय़ातील मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समधील मुख्य दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजारीमूल्य 92,130.59 कोटी रुपयांनी वाढले आहे. सदरच्या कामगिरीत प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी सर्वोच्च स्थानी राहिली आहे. यासोबतच एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि आयटीसी यांच्या बाजारीमूल्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
सलग तीन महिने भांडवल काढून घेतल्यानंतर विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूक पुन्हा देशात परतली आहे. जूनमध्ये आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात 21,235 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक करण्यात आली आहे तर मार्च एप्रिल आणि मे महिन्यात भारतामधून एकूण 1.3 लाख कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत.
बीएसईमधील पहिल्या दहा कंपन्यांचे बाजारमूल्य
कंपनी लाभ /तोटा बाजारमूल्य
टीसीएस………… 25,722.60… 7,93,854.51
इन्फोसिस………. 18,104.70… 3,98,648.65
एचयूएल………… 14,614.20… 5,06,198.81
आयटीसी……….. 13,521.45… 2,39,821.43
एचडीएफसी बँक. 12,460.20… 5,79,553.80
कोटक महिंद्रा बँक.. 7,707.44… 2,65,347.77
एचडीएफसी…… -11,996.55… 3,06,600.66
आरआयएल……. -10,713.59. 11,04,704.44
आयसीआयसीआय बँक -9,645.67 2,26,002.43
भारती एअरटेल…. -6,082.95… 3,05,674.88