वार्ताहर/ सांबरा
मुचंडी (ता. बेळगाव) येथे श्री जगतज्योती बसवेश्वर युवक संघ व श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्यावतीने नुकताच कोरोना योद्धय़ांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थांनी मल्लाप्पा सुगणी होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून महालिंग वालीशेट्टी, पिंटू खणगावकर, संजय चौगुले, संजय भद्रशेट्टी, बस्सू वालीशेट्टी व श्रीकांत नुग्यानट्टी उपस्थित होते.
सर्वत्र कोरोना रोगाचे संकट ओढवलेले असताना आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत कार्य केलेले डॉ. विवेक हिरेमठ, डॉ. विलास सुगणी, डॉ. राजशेखर कुंठगी, डॉ. रंगनाथ बजंत्री, डॉ. सिद्धु वडीयार, डॉ. चरंतीमठ, मंजुळा वालीशेट्टी, सोमव्वा मुळन्नावर, मलप्रभा पाटील, गीता भोसले, गोदाबाई कांबळे, विणा हिरेमठ, नागव्वा कुंभार, सुधा मोदगेकर, भाग्यश्री कोलकार, सन्मती जिनगोंड, कविता रगशेट्टी, आक्काताई सांबरेकर, आशा कारकर्त्या राजश्री भातकांडे, लक्ष्मी कोलकार, अनुसया रिजकुण्णावर, शिला कोलकार, ऋती शिंगे, पशुवैद्य डॉ. मनोहर पाखरे, व डॉ. मदन बिर्जे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पिंटु पाखरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ उपस्थित होते.