श्रीनगर
: जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा पोलिसांनी सोमवारी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी निगडीत असलेल्या तीन जणांना अटक केली. या तिघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. येथील त्राल भागात दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्र पुरवणे व अन्य प्रकारची मदत करण्यात यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.