प्रतिनिधी / मुणगे-
येथील भगवती मंदिर जवळ संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उद्घाटन मिठबांव आरोग्यकेंद्राचे डॉ. आर. बी. राठोड यांचे हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी माजी सभापती व पंचायत समिती सदस्य सुनिल पारकर, सरपंच साक्षी गुरव आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड चे रुग्णाचे प्रमाण वाढत असल्याने शासनाने प्रत्येक गावात कोविड सेंटर व संस्थात्मक विलिगीकरण कक्ष करण्याचे आदेश दिले असुन त्यासाठी पंधराव्या वित्तआयोगातील काही निधी खर्चकरण्याचे आदेश दिले आहेत . त्याव्यतीरिक्त होणारा खर्च ग्रामस्थ, हितचिंतक, देणगीदार यांच्या कडून होणाऱ्या आर्थिक सहाय्यातून करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने गावामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी संस्थात्मक विलिगीकरण कक्षाचे भगवती मंदिर येथील भक्तनिवास मध्ये मंगळवारीउद्घाटन करण्यात आले. महिलांसाठी व पुरूषांसाठी असे वेगवेगळे संस्थात्मक विलिगीकरण कक्ष करण्यात आले असून तुर्त दहा बेडचा कक्ष करण्यात आला आहे.