वार्ताहर / बाळेपुंद्री
मुतगा (ता. बेळगाव) गावातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना व्हॅक्सिन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुतगा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉ. हेमलता किवडसन्नावर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुतगा प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील 65 हून अधिक डॉक्टर, नर्स, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्यांना कोरोना व्हॅक्सिन लस देण्यात आली. डॉ. हेमलता किवडसन्नावर म्हणाल्या, गेल्या वर्षभरात कोरोना विरोधात सर्वांनी लढा दिला आहे. सदर लस स्वदेशी असून याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही याची माहिती त्यांनी दिली. यावेळी लोकप्रतिनिधींसह शिक्षकवर्ग उपस्थित होता.