सांबरा : म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पूर्व भागातील मुतगा व इतर गावांमध्ये कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. पूर्व भागातील मुतगा येथे शंभर टक्के बंद तर निलजी, सांबरा व बसवन कुडची येथील अनेक व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून कन्नड गुंडांच्या कृतीचा निषेध केला. अलीकडेच तालुका एकीकरण समितीमध्ये एकी झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांतील मरगळ दूर झाली असून पूर्व भागामध्ये कार्यकर्ते नव्या दमाने समितीच्या प्रवाहात सामील झाले आहेत. याचीच झलक मंगळवारी पुकारलेल्या बंदच्यावेळी पाहावयास मिळाली. पूर्व भागामध्ये कडकडीत बंद पाळून कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. त्यामुळे एरवी गजबजलेल्या ठिकाणी शुकशुकाट पाहावयास मिळत होता.
Previous Articleकुदेमनीत मंगळवारी शुकशुकाट
Next Article कडोलीत निषेधार्थ कडकडीत बंद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.