प्रतिनिधी /बेळगाव
मुतगा येथे अंगणवाडी इमारत बांधकामाला बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते चालना देण्यात आली. महिला व बालकल्याण खाते व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 14 लाख रुपये अनुदानातून ही इमारत उभी करण्यात येत आहे.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कॉलमचे पूजन करण्यात आले. यावेळी तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटील, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.
त्यानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी करडीगुद्दी येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून कोरोना थोपविण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर पाळा, लहान मुलांची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.