रस्ते कामाचा शुभारंभ, ता.पं.सदस्य सुनील अष्टेकर यांचा पुढाकार
प्रतिनिधी/ बेळगाव
तालुका पंचायत अनुदानातून मुतगा गावात विकासकामांना चालना देण्यात आली आहे. दोन रस्त्यांचे उद्घाटन करण्यात आले आहेत. गजानन पाटील यांच्या हस्ते कामांचे उद्घाटन करण्यात आले. दोन रस्त्यांसाठी 4 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तालुका पंचायत अनुदानातून मुतगा येथील संभाजीनगर व शिवाजीनगर येथे तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यानी अनुदान मंजूर करून आणले आहे. या दोन्ही रस्त्याच्या कामांना 4 लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून या भागातील रस्ते करण्याची मागणी नागरिक करत होते. हीच बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या मागणीनुसार सुनील अष्टेकर यांनी तालुका पंचायत फंडातून हे अनुदान मंजूर करून रस्तेकामांना चालना दिली आहे.
या कामांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नारळ फोडून या कामांना चालना देण्यात आली. यावेळी सचिन हेगडे, भागान्ना अलवाडकर, सुरेश पाटील, नागाप्पा पाटील, भारती पुजारी, संतोष परीट, वसंत पाटील, बाळू आची, मनोहर पाटील, रमेश चौगुले, भालचंद्र पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.