42,800 रुपये, पाच मोबाईल जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
मारिहाळ पोलिसांनी मुतगा येथे मटका घेणाऱया बुकींवर अचानक धाड घातली. तसेच मटका घेणाऱया 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्याकडील 42 हजार 800 रुपये रोख रक्कम, पाच मोबाईल आणि मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या आहेत. या घटनेमुळे मटकाबुकींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मुतगा येथे मोठय़ा प्रमाणात मटका घेण्यात येत असल्याची माहिती मारिहाळ पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी अचानक धाड टाकली. त्या ठिकाणी मटका घेत असलेल्या प्रतिक अशोक इंगळे (वय 24, रा. मुतगा), यल्लाप्पा कम्मार (वय 45, रा. शिंदोळी), सतीश राजू पाटील (वय 22), विकास सोमनाथ मुतगेकर, गजनंद परशराम सुतार (वय 19, सर्व रा. निलजी), महेंद्र रामचंद्र निलगार (वय 45), परशुराम केंदारी चिंगळे (वय 48), सदाशिव बसनगौडा पाटील (वय 29), शिवाजी जोतिबा कुरिहाळी (वय 63), पांडुरंग महादेव बिर्जे (वय 50, सर्व रा. सांबरा), मनोहर भावकाण्णा चौगुले (वय 58, रा. मुतगा) यांना अटक करण्यात आली.
सांबरा, बाळेकुंद्री, मारिहाळ या परिसरात मटका घेणाऱयांची संख्या वाढली आहे. याबाबत लोकांच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर अचानक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.