वार्ताहर / सांबरा
मुतगा शिवारातील नाल्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी मंगळवारी ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली. यावेळी नाल्याची पाहणी करून दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांना दिले.
गावच्या दक्षिणेकडून वाहणाऱया नाल्यामुळे दरवषी पावसाळय़ात गावातील तलाव भरतात. त्यामुळे हा नाला गावासाठी वरदान ठरला आहे. मात्र, दरवषी नाल्याचा बांध कोसळून नाला नादुरुस्त होत आहे. अशामुळे पाणी व्यर्थ वाहून जात आहे. नाल्याच्या दुरुस्तीसाठी शेतकऱयांना अनेक कसरती कराव्या लागत आहेत. त्यामुळे नाल्याची कायमस्वरुपी दुरुस्ती व्हावी यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी नाल्याची प्रत्यक्षात पाहणी करून दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. माजी आमदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाऊ पाटील, उमेश पुरी, राजेंद्र कणबरकर, बाळू बिरादार, आप्पाण्णा चौगुले, रमेश चौगुले उपस्थित होते.