वार्ताहर / सांबरा
मुतगे येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळा सुधारणा समिती अध्यक्षपदी आर. वाय. पाटील यांची फेरनिवड तर रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांची निवड करण्यात आली. शाळा सुधारणा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
बैठकीस द. म. शि. मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, सचिव विक्रम पाटील, सहसचिव दीपक देसाई, एम. बी. निर्मळकर, पी. पी. बेळगावकर उपस्थित होते. सुरुवातीला मुख्याध्यापक एम. वाय. केदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी आर. वाय. पाटील यांची फेरनिवड तर रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यापूर्वी शाळेच्या विकासकामात आणि शैक्षणिक प्रगतीत आर. वाय. पाटील यांनी भर घातली आहे. तर सुनील अष्टेकर हे यापूर्वी कमिटीत सदस्य पदावर असताना विकासकामांसाठी मोलाची कामगिरी केली आहे. याची दखल घेऊन निवड करण्यात आली. यावेळी सदस्य वाय. बी. संभाजीचे, श्रीनिवास पाटील, बाळाराम पाटील, शामराव पाटील, एन. डी. बंडाचे, पी. वाय. पाटील, प्राचार्य डी. एम. शितोळे, मुख्याध्यापक एस. आर. तिरवीर बैठकीला उपस्थित होते.