ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजपचे नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या महिलाबाबतच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विपर्यास करण्यात आला. महिलांबाबत इतकी आत्मीयता आहे, तर महाडिक यांच्या नावाने टाहो फोडण्यापेक्षा करुणा मुंडे यांना न्याय द्यावा, अशी भूमिका घेत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांची पाठराखण केली.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्याबाबत न्याय मागत आहेत. मात्र तो न्याय त्यांना दिला जात नाही. कोल्हापूर उत्तर मधून त्या निवडणूक लढवत आहेत. निदान ती बाब लक्षात घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून विरोधक चुकीचा मेसेज जनमानसात पसरवत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चंद्रकांत पाटील यांनी केला.