प्रतिनिधी /वास्को
मुरगांव भाजपा महिला मोर्चा समितीच्या अध्यक्षपदी छाया होन्नावरकर यांची निवड करण्यात आली आहे. मंत्री मिलिंद नाईक यांच्या हेडलॅण्ड-सडा येथील कार्यायलयात पार पडलेल्या कार्यक्रमात समितीची निवड जाहीर करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष डॉ. शितल नाईक उपस्थित होत्या.
समितीचे इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष – गायत्री कुबल, सरचिटणीस – जुही शेर्लेकर व आश्विनी पेडणेकर, सदस्य – सुमन सातोस्कर, मनस्वी कासकर, रूपाली पोळजी, दिया बांदोडकर, कौसर शेख मंजुषा पिळणकर, संजना केरकर, निशाल उस्कैकर, दिव्या खाजनेकर, नयन धुरी, सिंथीया परब, मधू चोपडेकर, दीपाली शेटय़े, ज्योती कवठणकर, प्रज्ञा देसाई, सुचिता नाईक, प्रतिमा मोर्जे, गीता मयेकर, साक्षी गोडकर, सुलक्षणा तळेकर, अम्रीन शेख, गौरी आरोलकर, भगिरथी नाईक, उज्वला कुमार, रसिका खाजनेकर, अंकिता सातार्डेकर, सुरेखा कांबळे, अश्विनी चोपडेकर, नमिता मेस्ता, शितल नाईक, कमिया पोळे, रमिला आरोलकर.
दरम्यान, मुरगांव भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी छाया होन्नावरकर यांची निवड झाल्याबद्धल मुरगांवचे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.