मुरगावचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत आहेत. पालिका कायदय़ांचा भंग करीत आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना पदांवर राहण्याचा अधिकारी नसून त्यांना नगरसेवक म्हणून अपात्र करावे अशी मागणी मुरगाव पालिका मंडळातील विरोध गटाने केली आहे. सत्ताधारी गटावर विरोधी गटाने भ्रष्टाचाराचाही आरोप केलेला आहे.
मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत तसेच उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर सफाई कामांसाठी मजूर पुरवण्यावरून अन्याय करीत असल्याचा दावा करून व नियमबाहय़ गोष्टींचा अवलंब करीत असल्याचा आरोप विरोधी गटाने मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. त्यांना पालिका कायदय़ांतर्गंत नगरसेवक म्हणून अपात्र ठरवणेच योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवक मुरारी बांदेकर म्हणाले की नंदादीप राऊत व त्यांचा गट सत्तेवर आल्यापासून स्वच्छतेची गंभीर समस्या विरोधी गटातील नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये निर्माण झालेली आहे. उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर मजूर पुरवण्याच्याबाबतीत दादागीरी करीत आहेत. हुकुमत बजावत आहेत आणि विरोधी गटावर अन्याय करीत आहेत. सत्ताधारी गटाकडून अधिकारांचाच गैरवापर चाललेला आहे. सफाई कामगार म्हणून ज्यांची भरती केली होती अशा काही कामगारांना कार्यालयात काम देण्यात आलेले आहे. या मागे भ्रष्टाचार आहे. त्यांना सफाईचे कामे देण्यात येणार नाही असे आश्वासन देण्यात आलेले आहे असा आरोप मुरारी बांदेकर यांनी केला. हेच कर्मचारी पैसा वसुलीसाठी आपणसुध्दा भ्रष्टाचार करतात. पालिका कार्यालयातील अधिकृत कर्मचारी आपले काम या कर्मचाऱयांवर सोपवतात असाही दावा बांदेकर यांनी केला. विरोधी गटाच्या प्रभागांमध्ये चाललेली कामे बंद करण्याचा आदेशही देण्यात येत आहे. त्यामुळे आमच्या प्रभागांमध्ये आमची कामे ठप्प झालेली आहेत. विरोधकांना मजूर पुरवल्यास मुख्याधिकाऱयांमार्फत कारवाईची धमकी उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर पालिका पर्यवेक्षकांना देत असतात असाही आरोप यावेळी मुरारी बांदेकर यांनी केला. या साऱयाचा परीणाम जनतेवर होत आहे. नगराध्यक्षांनी स्वताच्या कामासाठी पालिकेची कार वापरली व अपघात घडवला. या प्रकरणाचीही चौकशी सध्या मुख्याधिकाऱयांसमोर चालू आहे. पालिकेच्या गैरकारभाराविषयी अनेक तक्रारी मुख्याधिकारी व पालिका प्रशासकीय संचालकांना देण्यात आलेल्या आहेत. योग्य कारवाई करण्यास मुख्याधिकारीही मागे पडतात. नगरविकासमंत्र्यांकडेही तक्रारी करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती बांदेकर यांनी दिली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना अपात्र ठरवावे अशी मागणी त्यांनी केली.
मजूरांच्याबाबतीत आणि विकासाच्याबाबतीत विरोधी गटावर अन्याय करण्याचा प्रकार मुरगाव पालिकेत प्रथमच घडत असल्याचे माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांनी सांगितले. याचा परीणाम नगरसेवकांपेक्षा लोकांवर होत आहे. पालिका मंडळ आणि प्रशासनात गोंधळ चाललेला आहे. कामगारांना वेतन देण्यासाठी निधी नाही आणि वसुलीही होत नाही असे क्रितेश गावकर म्हणाले. नगरसेवक दाजी साळकर यांनी आपला गट सत्तेवर असताना आठ महिन्यात बारा कोटींची कामे उरकण्यात आली होती. ती कामे दिसतात. लोकांमध्ये उत्साह आहे. हेच सत्ताधारी गटाला खुपत आहे. त्यामुळे ते विरोधकांची कामे अडवतात असा आरोप केला. यासंबंधी आपण मुख्याधिकारी व पालिका प्रशासकीय संचालकांकडे तक्रार केलेली आहे. जनतेनेही याची दखल घ्यावी असे आवाहन साळकर यांनी केले.
यावेळी नगरसेवक शशिकांत परब, दामू कासकर, लियो रॉड्रिक्स, धनपाल स्वामी, सारीका पालकर, लाविना डिसोजा, सैफुल्ला खान उपस्थित होते.