आरोग्य कर्मचाऱयांवरील ताणही वाढला, कर्मचाऱयांनाही कोरोनाची बाधा
प्रतिनिधी / वास्को
लसीकरण आणि कोविड चाचणीसाठी वास्कोत गर्दी पडू लागली आहे. लसीकरण व कोविड चाचणीसाठी येणाऱया शेकडो लोकांबरोबरच शेकडो सर्वसामान्य रूग्णही वास्को आणि परीसरातील आरोग्य केंद्रावर येत आहेत. त्यामुळे सध्या आरोग्य कर्मचाऱयांवरील ताण वाढला आहे. त्यात आरोग्य कर्मचाऱयांनाही कोरोनाची बाधा होऊ लागल्याने आरोग्य खात्याची अडचण अधिकच वाढली आहे. कोरोनाने सध्या लोकांमध्ये भिती निर्माण केलेली असून त्याचमुळे लसीकरण आणि चाचण्यांकडे लोकांचा ओघ वाढत आहे. मुरगाव तालुक्यात दररोज शेकडो लोकांचे लसीकरण होऊ लागले आहे.
मागचे काही महिने नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि कोविड चाचणी या दोन्हींकडे दुर्लक्षच केले होते. त्यामुळे आरोग्य खात्याला लोकांची प्रतिक्षा करावी लागली होती. मात्र, एप्रील महिन्याच्या प्रारंभापासून कोविडने भयावह परिस्थिती निर्माण केल्याने आता लोक खडबडून जागे झालेले असून हे लोक लसीकरणासाठी धाव घेत आहेत. शेकडोंच्या संख्येने कोविड चाचण्याही येथील केंद्रांवर होत आहेत. त्यातल्या त्यात सर्वसामान्य रूग्णही आरोग्य केंद्रावर तपासणी व उपचारांसाठी येत असल्याने येथील आरोग्य केंद्रांवर बराच गोंधळ वाढलेला आहे. आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांवर बराच ताण येऊ लागला आहे.
ओघ वाढला, रोज शेकडो लोकांचे लसीकरण व चाचणी
वास्को शहरात वास्को शहर आरोग्य केंद्र तसेच चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणी व लसीकरण करण्यात येते. शहर आरोग्य केंद्राने लसीकरणाची सुविधा वास्को रवींद्र भवनमध्ये उपलब्ध केली आहे. तसेच कुठ्ठाळी आरोग्य केंद्र, कासावलीचे आरोग्य केंद्र व झुआरीनगर सांकवाळ येथील आरोग्य केंद्रातही लसीकरण व कोविड चाचणीची सुविधा आहे. या केंद्रांवर लोक मोठय़ा प्रमाणात येत असतात. कोरोना बांधीतांची वाढती संख्या तसेच रोज मोठय़ा संख्येने होणारे कोविड मृत्यू याचा लोकांना आता धसका घेतलेला आहे. त्यासाठी चाचणी आणि लसीकरणासाठी लोक धाव घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चिखलीतील हॉस्पिटल व मुरगाव तालुक्यातील आरोग्य केंद्रावर मोठय़ा रांगा लागत आहेत. चिखली उपजिल्हा हॉस्पिटलचे प्रमुख आरोग्याअधिकारी डॉ. अनिल हुम्रसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या हॉस्पिटलमध्ये दररोज 200 ते 250 लोक लसीकरण करून घेतात. तसेच कोविड चाचणीसाठीही दररोज 500 ते 600 लोक येत असतात. या चाचण्यांमध्ये दररोज 20 ते 25 कोविड बाधीत आढळून येतात. लक्षणे दिसत असलेल्या बाधीतांना दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जाते तर कोणतीही लक्षणे दिसत कोविड बाधीतांना घरीच कॉरन्टाईन होण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय त्यांना उपचारांचे किट दिले जाते. शिवाय ते बाधीत ज्या भागात राहतात तेथील आरोग्य केंद्रामार्फत त्यांच्या लक्ष ठेवले जाते अशी माहिती डॉ. हुम्रसकर यांनी दिली.
डॉक्टर्स, परीचारीका व इतर कर्मचाऱयानाही बाधा, हॉस्पिटलच्या अडचणीत वाढ
या शेकडो लोकांना सेवा देण्याबरोबरच चिखलीच्या हॉस्पिटलमध्ये रोज येणाऱया शेकडो बाहय़ रूग्णांनाही नियमीत सेवा पुरवावी लागते. या हॉस्पिटलच्या बाहय़ रूग्ण विभाग व कॅझ्युअलटीमध्ये रोज जवळपास तीनशे रूग्ण तपासणी व उपचारांसाठी येत असतात. हॉस्पिटलमध्ये येणाऱया शेकडो लोकांमुळे सध्या या हॉस्पिटलमध्ये आणि आवारामध्ये गर्दी उसळलेली पाहायला मिळते. त्यामुळेच चिखलीचे हे हॉस्पिटल बऱयाच प्रमाणात विनावापर असूनही या हॉस्पिटलचा कोविड रूग्णांसाठी करण्याचा विचार झालेला नाही. या हॉस्पिटच्या जागेचा कोविड रूग्णांसाटी वापर झाल्यास गोंधळ अधिक वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या रूग्ण सेवेमुळे चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलला सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना रूग्णांची सेवा करता करता अनेक डॉक्टर्स, परीचारीक व इतर विभागातील कर्मचारी मिळून 23 कर्मचारी कोरोना बाधीत झालेले असून त्यांना आपल्या डय़ूटीपासून दूर राहावे लागलेले आहे. ही या हॉस्पिटलची सध्या प्रमुख अडचण बनलेली आहे.
कासांवली व सांकवाळ आरोग्य केंद्रावरही लसीकरणाची सुविधा
वास्को शहर आरोग्य केंद्र व चिखलीतील हॉस्पिटल व्यतिरीक्त मुरगाव तालुक्यात कुठ्ठाळी केळशी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात कोविड चाचणी केली जाते. कासांवलीच्या आरोग्य केंद्रात लसीकरण व चाचणी दोन्ही सेवा उपलब्ध आहेत. शिवाय झुआरीनगर सांकवाळ येथील आरोग्य केंद्रातही कोविड लसीकरण केले जाते. या केंद्रावरही रोज शेकडो लोकांचे लसीकरण तसेच कोविड चाचणीही केली जाते. कुठ्ठाळी प्राथमीक आरोग्य केंद्राने आपल्या क्षेत्रातील कुठ्ठाळी, सांकवाळ, चिखली व इतर भागात स्थानिक आमदारांच्या माध्यमांतून टिका उत्सवांचेही आयोजन केले. यात उत्सवातही लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती कुठ्ठाळी आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सुकोर क्वाद्रोज यांनी दिली. आता अठरा वर्षांवरील सर्वांना लसी देण्यात येणार असल्याने लसीकरणासाठी केंद्रांची संख्या वाढवावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
बुधवारपर्यंत मुरगाव तालुक्यात 2670 कोरोना बाधीत
दरम्यान, कुठ्ठाळी आरोग्य केंद्राच्या हद्दीत कोरोना बाधीत मोठय़ा संख्येने आढळून येत आहेत. झुआरीनगरात दोन दिवसांपूर्वीच मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आलेला आहे. काल बुधवारी संध्याकाळपर्यंत कुठ्ठाळी आरोग्य केंद्रात 1192 कोरोना बाधीतांची नोंद झाली होती. कासांवलीच्या आरोग्य केंद्रात 694 तर वास्को शहर आरोग्य केंद्रात 784 कोरोना बाधीतांची नोंद झालेली होती. त्यामुळे मुरगाव तालुक्यात कोरोना बाधीतांची एकूण संख्या 2670 ऐवढी झाली आहे. कोरोना बाधीतांच्या वाढत्या संख्येमुळेच लसीकरणाकडे ओघ वाढत आहे. गेल्या काही दिवसांत वास्को शहर परीसरात अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागलेला असून वाढत्या मृत्यूमुळे भिती पसरलेली आहे.