प्रतिनिधी / वास्को
मुरगाव पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी बुधवारी एकूण 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकूण उमेदवारी अर्जांची संख्या 129 झाली आहे.
प्रभाग क्र. 4 मध्ये सरिता नागेश पालकर, सीमा दिनानाथ किनळेकर, प्रभाग क्र. 7 मध्ये शमीर खान, प्रभाग क्र. 9 मध्ये योगिता जी. पार्सेकर, प्रभाग क्र. 10 मध्ये सुचिता नामदेव शिरोडकर, सरीना महमद गावस शेख, प्रभाग क्र. 11 मध्ये नारायण मुकूंद बोरकर, शीतल प्रशांत नार्वेकर, रवीराज अनिल रेडकर, इफ्फी सेबेस्तियाव फर्नांडिस, सेबेस्तियाव डोमींगोस डिसोजा, प्रभाग क्र. 12 मध्ये सुरेंद्र गुरूदास चोडणकर, सैफुल्ला बशीर खान, प्रभाग क्र. 13 मध्ये शमी कृष्णा साळकर, रोचना गिरीष बोरकर, शलाका सुरेश कांबळी.
प्रभाग क्र. 14 मध्ये रूपेश रामदास नाईक, प्रभाग क्र. 16 मध्ये रोचना गिरीष बोरकर, प्रभाग क्र. 17 मध्ये समीना सलीम शेख, हीना अब्दुल खान, नेनी जुझे डिसोजा, सय्यद रियाज कद्री, रूपेश कृष्णा सातार्डेकर, प्रभाग क्र. 19 मध्ये स्नेहल संजय कोरगांवकर, पुजा विशाल नाईक, प्रभाग क्र. 21 मध्ये श्रद्धा आपा महाले, सबीना सय्यद, स्नेहा औदुंबर फोंडेकर, प्रभाग क्र. 22 मध्ये सुदेश मधुकर भोसले, रूपेश सुरेश शिवलिंगकर, प्रभाग क्र. 23 मध्ये विनोद सहदेव किनळेकर, संतोष उत्तम केरकर, प्रभाग क्र. 24 मध्ये कॅटरिना झेवियर, प्रभाग क्र. 25 मध्ये ग्रासिएस अल्लेलुईया कुतिन्हो, उर्मीला उमाकांत साळगांवकर, सुरेंद्र प्रभाकर मडकईकर, सुलक्षा रोहन नाईक यांचा समावेश आहे. मुरगांवसाठी आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या 129 झाली.