प्रतिनिधी /वास्को
गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या संततधार पावसामुळे हार्बर येथील चौगुले हाऊस उभे असलेल्या डोंगराची दरड कोसळली आहे. ही दरड कोसळल्याने चौगुले हाऊसकडे जाणारा रस्ता धोक्यात आलेला असून या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. गेल्या काही दिवसांत पडलेल्या संततधार पावसाने वास्को परीसराला झोडपलेले असून शहरातील रस्ते वारंवार पाण्याखाली जाऊ लागले आहेत. मात्र, परीसरात विशेष नुकसानीच्या घटना या पावसात घडलेल्या नाहीत. हार्बर येथील चौगुले हाऊसजवळील दरड कोसळण्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या ठिकाणी तातडीने उपाययोजना न केल्यास चौगुले हाऊस इमारतीना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.