नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या निषेधाच्या घोषणा: मुरगूडमध्ये कोरोना रुग्णांवरुन प्रचंड गोंधळ
यमगे/प्रतिनिधी
शहरात काल बुधवारी सापडलेला पहिला कोरोनाबाधित 20 वर्षीय रुग्ण हा प्रशासनाने कागदोपत्री संस्थात्मक क्वारंटाईन दाखवला आहे.पण प्रत्यक्षात हा रुग्ण केवळ एकच दिवस कन्या विद्यामंदिर या शाळेमध्ये क्वारंटाईन असल्याचे पुरावे देत नागरिकांनी आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना पालिकेत जाऊन घेराव घातला. याठिकाणी प्रचंड गोंधळ सुरु झाला आहे. संतप्त नागरिकांनी काही बॅनर फाडून भिरकावले पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करत संपूर्ण पालिका, स्वच्छता कर्मचारी क्वारंटाईन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
यावेळी झालेल्या घोषणाबाजीत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यावर नागरिकांनी चप्पल फेक केली पण सुदैवाने ते बचावले. संतप्त नागरिकांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी निवेदन स्वीकारावे अशी मागणी केली.सदर रुग्णाला पाठीशी घालून त्याला घरी दडवणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याचा जाब लोकांनी विचारला त्याचे उत्तर नगराध्यक्षानी समोर येऊन द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली. समजावण्याचा प्रयत्न केला.