प्रतिनिधी/ बेंगळूर
माहिती व जनसंपर्क विभागाचे संयुक्त संचालक डी. पी. मुरलीधर यांना राज्य शासनाचा राज्यस्तरीय सर्वोत्तम पुरस्कार जाहीर झाला आहे. मुरलीधर यांच्यासह एकूण 30 अधिकारी व कर्मचाऱयांची यासाठी निवड झाली आहे.
50 हजार रुपये रोख आणि पुरस्कार असे त्याचे स्वरुप आहे. 1990 मध्ये साहाय्यक संचालक म्हणून मुरलीधर यांनी माहिती खात्यात सेवाकार्याला सुरुवात केली. कोलार, रायचूर, बेंगळूर, नवी दिल्ली येथेही त्यांनी उपसंचालक म्हणून सेवा बजावली आहे. बेंगळूर येथील मुख्य कार्यालयात प्रामाणिकपणे सेवा बजावणारे मुरलीधर आता माहिती खात्याचे सहसंचालक आहेत.