वार्ताहर / मौजेदापोली
दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी कासवाच्या पिल्लांचे नुकतेच जलार्पण करण्यात आले. आतापर्यंत सुमारे 55 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. दरवर्षी मुरूडमध्ये ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी सापडतात. येथील कासव मित्र ज्ञानेश्वर माने व सहकारी राजेश शिगवण यांनी कासवाची 23 घरटी संरक्षित करून ठेवली आहेत. पहाटे व सायंकाळी या पिल्लांना पाण्यात सोडले जाते. हे दृष्य पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करतात. नुकत्याच झालेल्या पिल्लांच्या जलार्पणावेळी कासवमित्र ज्ञानेश्वर माने, राजेश शिगवण, राजेश नरवणकर, अरूण नरवणकर, ग्रा. पं. सदस्य रंजन पुसाळकर, कर्मचारी प्रिया पाष्टे, पर्यटक, ग्रामस्थ उपस्थित होते.