कोरोनाच्या तिसर्या लाटेने मुलांवर होणार्या संभाव्य परिणाबाबत चर्चा सुरू असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
- एका ताज्या अभ्यासात म्हटले की, कोरोना संसर्गाने मुले गंभीर आजारी पडण्याची शक्यता असून नसल्यासारखी आहे. हा दावा ब्रिटनमधील अनेक विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. अभ्यासानुसार मुलांत कोरानातून बाहेर येण्याचा दर 99.995 टक्के इतका आहे.
- कोविडचा धोका कोणाला राहू शकतो, याबाबत अध्ययन करण्यात आले. ज्या मुलांना अगोदरपासून आजार आहे, अशा मुलांना कोरोनाचा धोका राहू शकते. ब्रिस्टल यूनिर्व्हसिटीचे बालरोग विभागाचे रजिस्ट्रार डॉ. क्लेर स्मिथ यांच्या देखरेखीखाली केलेल्या अभ्यासातून म्हटले की, ब्रिटनमध्ये मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान 61 मुलांचा मृत्यू झाला. यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या केवळ 25 आहे. तर यादरम्यान 4 लाख 69 हजार जणांना बाधा झाली होती. म्हणजेच 99.995 टक्के मुलांनी कोरोनावर मात केली.
- संशोधनात विद्यापीठ कॉलेज लंडन, इम्पिरियल कॉलेज, यूनिर्व्हर्सिटी यॉर्क आणि यूनिर्व्हसिटी ऑफ लिव्हरपूलच्या तज्ञांनी या अभ्यासात सहभाग घेतला. संशोधकांनी म्हटले की, 18 पेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी लसीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला असून त्यादृष्टीने प्रयत्न करावे, असा सल्ला दिला आहे.
- या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे पाच लाख मुलांपैकी केवळ एका मुलाच्या जीवाला धोका आहे. म्हणजेच प्रत्येक दहा लाख मुलांपैकी कोरोनाने मृत्यु होण्याचे प्रमाण केवळ दोनच आहे. संशोधनाच्या पथकात असलेले रसेल वायनर यांनी म्हटले की, कोरोनामुळे गंभीर आजारी पडण्याचे किंवा मृत्यु होण्याचा धोका हा खूपच कमी आहे.
- संशोधकांनी म्हटले की, 50 हजार बाधित रुग्णांपैकी केवळ एका मुलाला भरती करण्याची गरज पडू शकते. मुलांत संसर्गानंतर दुर्मीळ इंफ्लेमेंटरी सिंड्रोम (पीआयएमएसटीएस) चा धोका हा 40 हजारात केवळ एका मुलांत आढळून आला.
- प्रो. रसेल यांनी म्हटले की, मुलांच्या लसीकरणाच्या निर्णयाच्या अगोदर सविस्तर संशोधन करणे गरजेचे आहे. अमेरिका-इस्त्राइलमधील मुलांवर होणारे संशोधन लक्षात घेतले पाहिजे. यात एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे मुलांचे काही गट असे आहेत की त्यांचे लसीकरण आवश्यक आहेत.