बेंगळूर : राज्यात कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात मुलांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहेत. बेंगळूरमध्ये मुलांसाठी 1,419 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याणमंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. सोमवारी बेंगळूरच्या विकाससौध येथे बेंगळूर शहर जिल्हा आणि बेंगळूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि जिल्हा केंद्रांमध्ये बालरोग तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेवेळी मुलांवर उपचार करण्यासाठी या तज्ञांची मदत होणार आहे, असे त्या म्हणाल्या. कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे 50 मुलांना आई-वडील गमवावे लागले आहेत. या मुलांना बालसेवा योजनेतून दरमहा 3,500 रुपये तसेच मोफत शिक्षण दिले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
Previous Articleविजापूरसह आणखी 6 जिल्हय़ांमध्ये अनलॉक 2.0 जारी
Next Article लॉकडाऊन कालावधीतही मद्यविक्री 10 टक्के अधिक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.