मंत्री शशिकला जोल्ले यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र
बेंगळूर : कोरोनाच्या दुसऱया लाटेचा युवा वर्गावर मोठा परिणाम झाला आहे. तर कोरोनाच्या तिसऱया लाटेचा लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरिय रुग्णालयात लहान मुलांसाठी बेड्स राखीव ठेवावेत, अशी मागणी महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस वाढत चालली असून मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. येत्या काही दिवसांत तिसरी लाटही पसरण्याची शक्मयता तज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. सध्या कोरोना संसर्गापासून मुलांचा बचाव करण्यासाठी उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. तसेच खबरदारी म्हणून राज्याच्या प्रत्येक जिल्हय़ातील बालरोग विभाग आणि तालुका रुग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी बेड्स राखीव ठेवावेत. त्याचबरोबर इतर संबंधित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही मंत्री शशिकला जोल्ले यांनी केली आहे.