बिल भरण्यासाठी विकावी लागली कार
ब्रिटनमध्ये एका पित्याला स्वतःची कार विकावी लागली आहे. त्यांच्या 7 वर्षीय मुलाने मोबाईलवर केवळ एक तास गेम खेळून आयटय़ून्सचे बिल 1800 डॉलर्स (सुमारे 1 लाख 33 हजार रुपये) केले हेत. 7 वर्षीय अशाज मुतासाने रिस्क ऑफ बर्स्क गेम खेळताना अनेक महागडे टॉप-अप्स खरेदी केले होते. याची माहिती अशाजच्या 41 वर्षीय पित्याला याची माहिती मिळेपर्यंत बराच उशीर झाला होता. या टॉप-अप्सची रेंज 2.70 डॉलर्सपासून (200 रुपये) 138 डॉलर्सपर्यंत (10 हजार रुपये) होती.
एका मागोमाग एक 29 ईमेल मिळाल्यावर त्यांना मुलाने घोळ घातल्याचे लक्षात आले. पण प्रारंभी त्यांना एखाद्या ऑनलाईन स्कॅमचे मेल मिळाल्याचे वाटले होते. पण नंतर त्यांना आयटय़ून्सचे बिल भरण्यासाठी स्वतःची टोयोटा अयागो कार विकावी लागली आहे.
मुलांच्या गेमवर इतका पैसा खर्च होऊ शकतो हा विचारच मी कधी केला नव्हता असे ते सांगतात. या घटनेनंतर त्यांनी ऍपल कंपनीकडे तक्रार केली असता त्यांना 287 डॉलर्सचा (21 हजार रुपये) रिफंड मिळाला आहे. पण उर्वरित बिल भरण्यासाठी त्यांना कार विकाली लागली आहे.