विजापूर/वार्ताहर
मुलाला सोबत घेऊन कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईचा मुलासह विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्हय़ातील आलमेल तालुक्यातील आसंगीहाळ येथे 27 रोजी घडली. कविता व अमृष (वय 5) अशी मृत मायलेकरांची नावे आहेत.
या घटनेची समजलेली माहिती अशी, कविता ही गावानजीक असलेल्या शेतजमिनीतील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी तिने आपल्या पाच वर्षीय मुलाला सोबत घेतले होते. दरम्यान कविता कपडे धूत असतानाच नजीक असणारा अमृष हा पाण्यात पडला. दरम्यान त्याला वाचविण्यासाठी आई कविता हिने पाण्यात उडी घेतली. पण तिला पोहता येत नव्हते. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आलमेल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद आलमेल पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.