जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा : बैलहोंगल तालुका संघ, सर्वोदय स्कूल खानापूर संघ यांना उपविजेतेपद
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे जिल्हास्तरीय माध्यमिक मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात संत मीराने बैलहोंगल संघाचा 2-0 व मुलांच्या गटात सेंट पॉल्सने सर्वोदय खानापूरचा 4-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बैलहोंगल तालुक्मयाने बेळगाव ग्रामीणचा टायब्रेकरवर 1-0 असा पराभव केला. बैलहोंगलतर्फे योगेश्वरीने एकमेव गोल केला. अंतिम सामन्यात संत मीरा बेळगाव शहराने बैलहोंगल तालुक्मयाचा 2-0 असा पराभव केला. संत मीराच्या सलामी व स्वरा आंजणकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. मुलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल्स बेळगाव शहराने ज्ञान प्रबोधन बेळगाव ग्रामीणचा 4-2 असा पराभव केला. दुसऱया उपांत्य सामन्यात सर्वोदय स्कूल खानापूरने बैलहोंगल तालुक्मयाचा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सेंट पॉल्स बेळगाव शहराने सर्वोदय स्कूल खानापूरचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला सेंट पॉल्सतर्फे नोवेल शेख 1 गोल, अथर्व डीने 2 गोल, जोशवा वॉझने 1 गोल केला. दोन्ही विजेते संघ बेळगाव येथे होणाऱया विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाशिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी डी एस डिग्रेज, शहराच्या पीईओ जहिदा पटेल, ज्ये÷ ऍथलेटिक प्रशिक्षक व क्रीडा भारती राज्य सचिव अशोक शिंत्रे, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना सचिव अमित पाटील, नगरसेवक आनंद चव्हाण, विवेक पाटील, आर पी वंटगुडी, संजीव बडगेर, एल बी नाईक, उमेश कुलकर्णी, अशोक अण्णीगेरी, एन एम मन्नोळकर, बापुसाहेब देसाई, जी बी पाटील, जयसिंग धनाजी, अल्लाबक्ष बेपारी या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश मजुकर, योगेश साळगांवकर, शशांक बोळगुंडी यांनी काम पाहिले.