केएसआरपीतर्फे व्ही.एस.पाटील हायस्कूल मच्छे येथे कराटे प्रशिक्षणाचे उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलमध्ये कर्नाटक स्टेट रिझर्व्ह पोलीस प्रशिक्षण केंद्र मच्छेतर्फे कराटे प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या केएसआरपी बटालियन-2 च्या आरपीआय ज्योती परांडे म्हणाल्या, मुलींनी स्वसंरक्षणासाठी सतत सज्ज असणे आवश्यक आहे. आमच्या प्रशिक्षिकांतर्फे देण्यात येणाऱया कराटे प्रशिक्षणाचा विद्यार्थिनींनी आपल्या पुढील आयुष्यात उपयोग करावा, असे मत व्यक्त केले.
मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कराटे प्रशिक्षणाचे फायदे सांगून विद्यार्थिनींना या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी केएसआरपीच्या प्रशिक्षिका सविता हळ्ळूर, मंजुळा बन्नीकोड व नंदा वेंकारेड्डी यांनी कराटे प्रशिक्षणाबद्दल माहिती सांगितली. विद्यार्थिनी आरती सांबरेकर व मधुरा लाड यांनीही मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन शिक्षक एस. आर. कम्मार यांनी केले. ए. पी. नाकाडी यांनी आभार मानले. याप्रसंगी सहशिक्षक ए. बी. पाटील, एस. एच. पाटील, पी. एम. पाटील, जे. डी. बिर्जे, आर. ए. देसूरकर, एस. एन. पाटील, पी. के. पाटील, के. बी. रंगाई, के. एस. सुळगेकर, संभाजी देसाई, अनिता गुंडोजी, नीता पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.