ग्रामीण पोलिसात दुसरा गुन्हा दाखल
प्रतिनिधी / मिरज
मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सतीश जगन्नाथ आंबवडे या दारुड्या बापावर मिरज ग्रामीण पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगाची घटना घडल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ सुमारे दहा हजार रुपये किमतीची तलवार मिळून आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुभाषनगर येथे क्षिरसागर मळ्यात माहेरी आलेल्या मुलीचा सतीश आंबवडे याने विनयभंग केला होता. तशी फिर्याद तिच्या मुलीने मिरज ग्रामीण पोलिसात दिली होती. मुलीच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सतीश याला अटक करून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, त्याची अंग झडती घेतेवेळी पोलिसांना त्याच्याजवळ एक तलवार मिळून आली. पोलिसांनी या तलवारी बाबत विचारले असता सतीश याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्यावर विनायभंगाबरोबरच बेकायदेशीररित्या हत्यार बाळगल्याचा गुन्हाही दाखल केला आहे.