प्रतिनिधी / मडगाव
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील फेजीवाडा येथील जामा मशिदीचे मौलवी शबीर शेख याला महाराष्ट्र पोलिसांनी फातोर्डा पोलिसांच्या साहाय्याने गुरुवारी फातोर्डा येथून अटक केली. एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे या मौलवीने अपहरण केल्याचा आरोप आहे.
राधानगरी पोलीस गोव्यात आले आणि त्यांनी फातोर्डा पोलिसांचे आरोपीला पकडण्यासाठी साहाय्य मागितले तेव्हा पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची एक तुकडी फातोर्डा येथे गेली. आरोपीने फातोर्डा येथे एक खोली भाडय़ाने घेतली होती व तेथे तो या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर राहात होता.
आरोपी अमूक ठिकाणी असल्याची चाहूल लागताच पोलिसानी आरोपीला ताब्यात घेऊन राधानगरी पोलिसांच्या स्वाधीन करुन 15 वर्षीय मुलीची सुटका केली.