कुंडल / वार्ताहर
घोगाव ता.पलूस येथील कुनाल योगेश कांबळे, योगेश काशिनाथ कांबळे व कल्याणी योगेश कांबळे रा. घोगाव, ता.पलूस या तिघांनी परशुराम यांनी आपल्या मुलीची छेड का काढली याचा जाब विचारावयास गेले असता त्यांना काठी, कोयत्याने हल्ला करुन जिवे मारणेचा प्रयत्न केला. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून यासंबधीची फीर्याद दिलीप ज्ञानू देवकुळे यांनी कुंडल पोलीसात दिली आहे.
याबाबत कुंडल पोलीसातून मिळालेली माहिती अशी, घोंगाव येथील फिर्यादी दिलीप ज्ञानू देवकुळे हे सकाळी पावणे अकराचे दरम्यान घरासमोर उभे असता आरोपी योगेश काशिनाथ कांबळे यांच्या घराजवळ भांडणाचा आवाज आला म्हणून गेले. त्यावेळी त्यांचा पुतण्या परशुराम व आरोपी योगेश कांबळे यांच्यात वाद सुरु होता. परशुराम हा कुनाल योगेश कांबळे यास तु माझ्या मुलीची छेड का काढतोस म्हणून जाब विचारला असता आरोपी योगेश काशिनाथ कांबळे व कल्याणी योगेश कांबळे यांनी त्यांच्या हातातील काठ्यांनी परशुराम यास मारहाण करुन शिविगाळ करत होते.
फिर्यादी दिलीप देवकुळे हे भांडण सोडविणेस गेले असता आरोपींनी आमच्या भांडणात तुझा काय संबध तु का आलास आता तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत व शिवीगाळ करत आरोपी कुनाल योगेश कांबळे,याने हातातील कोयत्याने फीर्यादीच्या दंडावर, खांद्यावर व मानेवर वार करुन जिवे मारणेचा प्रयत्न केला. या घटनेची नोंद कुंडल पोलीसात झाली असून घटनास्थळी तासगाव डी.वाय.एस.पी.अश्विनी शेंडगे यांनी भेट देऊन पुढील तपासासंदर्भात कुंडल पोलीसांना सुचना केल्या असून आरोपींचा शोध सुरु आहे.