प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरानजीकच्या खेडशी येथील गवाणकर कुटुंबात लेकीच्या मृत्यूनंतर व्यथित झालेल्या वडिलांनीहे केलेल्या आत्महत्येने खेडशी गाव पुन्हा एकदा हादरून गेल़ा मानसिक तणावाखाली वावरणाऱया अरविंद सीताराम गवाणकर (50) यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी खेडशी रेल्वेपुलाखाली आढळून आल्याने खळबळ उडाल़ी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद गवाणकर हे गुरूवारी सकाळपासून घरातून बेपत्ता होत़े कुटुंबियांकडून त्यांची शोधाशोध सुरू होत़ी शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह खेडशी परिसरातील रेल्वे पुलाखाली दिसून आल़ा याविषयी अरविंद यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आह़े आठवडाभरापूर्वी अरविंद गवाणकर कुटुंबियांना अन्नातून विषबाधा झाली होत़ी अरविंद, त्यांचा मुलगा, 15 वर्षीची मुलगी भूमिका अशा तिघांना अंडय़ाची बुर्जी खाल्ल्याने विषबाधा झाली होत़ी तिघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े तेथे मुलगी भूमिकाची प्रकृती अधिकच खालावल़ी त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े उपचारादरम्यान 27 मार्च रोजी भूमिकाचा मृत्यू झाला होत़ा
या घटनेने गवाणकर कुटुंबिय पुरते हादरून गेले होत़े गावातही हळहळ व्यक्त केली जात होत़ी या काळात अरविंद यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होत़े त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आल़े मुलीच्या मृत्यूनंतर अवघे कुटुंबच मानसिक तणावाखाली होत़े गुरूवारी सकाळी मुलीचा सारी भरण्याचा विधी करण्यात आला. याचदरम्यान अरविंद कोणालाही न सांगता राहत्या घरातून बेपत्ता झाले होत़े गुरूवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात येत होत़ा कुठेही थांगपत्ता न लागल्याने कुटुंबियांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची खबर दिल़ी शुक्रवारी सकाळी अरविंद यांचा मृतदेह खेडशी रेल्वेपुलाखाली असल्याचे निदर्शनास आल़े दरम्यान पुलावरून उडी मारून अरविंद यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आले आह़े पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आह़े