परंतु कौलोत्सव नाही. केवळ धार्मिक विधी. पेठ मंदिराजवळ स्थानापन्न. मयेची माल्यांची जत्रा झालीच नाही. सर्व धोंडगणांचे मात्र कडक सोवळे व्रत.
डिचोली/प्रतिनिधी
मयेतील थोरली बहिण केळबाई देवीकडे तीन दिवसांच्या पाहुणचारासाठी गेलेल्या मुळगावातील लहान बहिण देवी केळबाई काल बुधवारी सकाळी आपल्या मुळगावी परत दाखल झाली. मुळगावात आल्यानंतर देवी केळबाई आपल्या सर्व मानकरी व भक्तांना कौल देते. मात्र यावषी कोवीड संसर्गाच्या धोक्मयामुळे कौलोत्सव रद्द करण्यात आल्याने भाविकांना देवीने कौल दिला नाही. मुळगावात पेठेची केवळ धार्मिक विधी संपन्न झाल्या. मयेतील माल्यांची जत्रा संपन्न झालीच नाही. तरीही मुळगाव आणि मयेतील जत्रोत्सवाच्या असंख्य धोंडगणांनी आपले सोवळे व्रत मात्र पूर्ण श्रध्दा भावनेने पाळले.
चैत्र शुध्द पंचमीच्या दिवशी ठरल्याप्रमाणे मुळगावातील पेठ मयेतील देवी केळबाईसह तीन दिवसांच्या पाहुणचारासाठी रवाना झाली. मात्र मये येथील देवस्थान समितीने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जत्रोत्सव ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने याही वषी या दोन्ही बहाणींची भेट होऊ शकली नाही. तसेच एकत्रित एकमेकांच्या सहवासात गावकरवाडा मये येथील चव्हाटा येथे होणारे (पाहुणचार) वास्तव्यही होऊ शकले नाही.
मुळगवातून मयेच्या दिशेने येण्यास निघालेली मुळगावची पेठ केळबाईवाडा मये येथील देवी केळबाईच्या मंदिरात दाखल झाल्यावर मंदिराचा दरवाजा बंद असल्याने पेठ तशीच मुळगावातील धोंडगणांच्या समवेत गावकरवाडा मये येथील चव्हाटा येथे दाखल झाली. तेथे मयेतील चौगुले मानकऱयांकडून मुळगावची पेठ सोडविली जाते. मात्र ती खोलण्यासाठी मयेतील चौगुले मानकरी उपस्थित नसल्याने ती खोलली गेली नाही.
माल्यांची जत्रा नाही, देवीचा पण यावषीही अपूर्ण.
तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर मंगळ दि. 20 एप्रिल रोजी रात्री मुळगावातील देवीचे मोड, चौगुले मानकरी, धोंडगण आण मोठय़ा संख्येने ग्रामस्थ दाखल झाले. आणि मुळगावची पेठ घेऊन ते मुळगावात रवाना झाले. मुळगावची पेठ मुळगावात रवाना झाल्यानंतर मयेत माल्यांची जत्रा साजरी केली जाते. मात्र यावेळी देवस्थान समितीने कोवीड संसर्गाच्या भितीने जत्राच रद्द केल्याने सदर जत्राच होऊ शकली नाही. त्यामुळे देवीचे माले पेटलेच नाही, आणि मयेतील देवी केळबाईचा अंगावर अग्नी घेऊन चौखांबावर नृत करण्याचा पण अपूर्णच राहिला.
मुळगावची देवी मुळगावात दाखल, मात्र कौलोत्सव नाही. मयेतून रात्री उशिरा मुळगावला येण्यास निघालेली मुळगावच्या देवी केळबाईची पेठ मुळगावात पहाटे दाखल झाली. मुळगावातील दाडाकडे येथे पेठ ठेवून अल्प काळासाठी विश्रांती घेतली जाते. त्यानंतर सकाळी पेठ गावात सर्व मानकरी व नंतर भाविकांना कौल देते. मात्र यावषी कोरोनाच्या भितीमुळे कौलोत्सव रद्द करण्यात आल्याने पेठेची सकाळी राऊत, गाड व परब मानकऱयां?कडून तसेच सराफ कुटूबियांकडून पुजा करण्यात आल्यानंतर पेठ थेट मंदिराकडे दाखल झाली. मंदिराजवळ पाच फेरे मारल्यानंतर पेठ मंदिराजवळ स्थानापन्न झाली. पेठेचा कौलोत्सव झाला नाही.