साहित्य : 1 वाटी बारीक चिरलेला मुळय़ाचा पाला, 1 वाटी बेसन, चिमुटभर हळद पावडर, चवीपुरते मीठ, 4 ते 5 लसूण पाकळय़ा चिरून, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 4 कढीपत्ता पाने, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे तेल
कृती : प्रथम मुळय़ाच्या पाल्यामध्ये थोडेसे मीठ टाकून पाला कुस्करून घ्यावा. त्याला सुटलेले पाणी काढून फक्त पाला घट्ट घ्यावा. गरम तेलात मोहरी टाकून तडतडावी. नंतर त्यात जिरं आणि लसूण टाकून लालसर परतवावी. नंतर त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतवावा. आता कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कुस्करलेला मुळय़ाचा पाला टाकून लालसर होईपर्यंत परतवावा. नंतर हळद पावडर, बेसन व मीठ टाकून मिश्रण मिक्स करावे. नंतर थोडे थोडे पाणी (जास्त न घालता) घालून मिश्रणामध्ये गुठळय़ा न होता एकसारखे ढवळत शिजवून घ्यावे. मिश्रण मंद आचेवरच पाच मिनिटे शिजू द्यावे. आता तयार मुळा बेसन भाकरी अथवा चपातीसोबत खाण्यास द्या.