प्रतिनिधी /मडगांव
मुळ लोलये-काणकोण येथील व सद्या दुबईत स्थायिक झालेल्य पालोमा सायनोरा व्हियेगस (17) हिला प्रतिष्ठेचा डायना प्रिन्सेस पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार काल सोमवार दि. 28 रोजी तिला ऑनलाईनच्या माध्यमांतून प्रदान करण्यात आला. पालोमा ही प्रविण आणि सुनीता सोफिया आंद्राद व्हियेगस यांची कन्या आहे.
पालोमा या दुबईतील जेम्स अवर ओन इंग्रजी हायस्कूलच्या विद्यार्थीनी आहे. पालोमा एक मानसिक आरोग्य अभियानकर्ता असून तिने स्वता पुढाकार घेऊन स्वताची वेबसाइट बनविली,
पालोमा या एक उत्कृष्ट स्कूल कौन्सिल सदस्य म्हणून कार्यरत आहे. शाळांमधील मानसिक आरोग्याविषयी मोहिमेचा त्या एक भाग बनल्या आहेत. त्यांनी ‘निर्बंधित’ संभाषण. व्यक्त व्हा आणि सामायिक करा.’ हा माहितीचा स्रोत म्हणून वापरला केला आहे.
‘इनोव्हेशन लीडर’ ही पदवी प्राप्त करणारी पालोमा ही पहिलीच विद्यार्थिनी आहे. वायु शुद्ध केल्याने लोकांना प्रदूषणापासून संरक्षण मिळते, त्यासाठी ही तिने योगदान दिलेले आहे. भविष्यात पालोमाचे स्वप्न वकील होण्याचे आहे. जेणेकरून ती तिचे आयुष्य इतरांकडे न्याय मिळवून देण्यासाठी घालवू शकेल.
डायना पुरस्कार हा डायना प्रिन्सेस ऑफ वेल्स, यांच्या स्मरणार्थ दिला जातो. डायनाच्या दोन्ही मुलांचा ‘डय़ूक ऑफ केंब्रिज’ आणि ‘डय़ूक ऑफ ससेक्स’ यांचा या पुरस्काराला पाठिंबा आहे. पुरस्कारासाठी पुरस्कृत व्यक्तींची निवड कठोर नामांकन प्रक्रियेद्वारे केली जाते. नामनिर्देशित व्यक्तींना पाच मुख्य क्षेत्रांमध्ये नामनिर्देशित व्यक्तींचा प्रभाव दर्शविणे आवश्यक असते. त्यात सामाजिक प्रभाव, इतरांना प्रेरणा देणारा, युवा नेतृत्व आणि सेवा प्रवास याचा समावेश असतो.