वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मुश्फिकुर रहीमने झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱया टी-20 मालिकेतून ब्रेकची मागणी केली आहे. दरम्यान झिंबाब्वेविरूद्ध होणाऱया आगामी टी-20 मालिकेसाठी आपली निवड करू नये असे रहीमने बांगलादेशच्या निवड समितीला कळविले आहे. मात्र रहीमच्या या विनंतीला बांगलादेश क्रिकेट मंडळाने त्याची विनंती मान्य केली आहे, मात्र त्याने अधिकृतपणे कळविल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
झिंबाब्वेच्या दौऱयात आपण कसोटी आणि वनडे मालिकेसाठी उपलब्ध राहू असे रहीमने निवड समितीला कळविले आहे. सातत्याने क्रिकेट सामने खेळत असल्याने आपली दमछाक होत असून काही कालावधीकरिता आपल्याला विश्रांती मिळावी अशी विनंती रहीमने बांगलादेश क्रिकेट मंडळाकडे केली आहे. बांगलादेशचा संघ 29 जून ते 28 जुलै दरम्यान झिंबाब्वेच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात एक कसोटी, 3 वनडे, तीन टी-20 सामने खेळणार आहे.