– भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप – मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांमध्ये सहभाग
प्रतिनिधी/मुंबई
महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत डॉ. सोमय्या यांनी हसन मुश्रीफ, त्यांची पत्नी आणि पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱयांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.
डॉ. सोमय्या यांनी सांगितले की, मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते. मुश्रीफ यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढविताना उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसत आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक आहेत. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँडरिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते. या प्रकरणी मंगळवारी ईडीमध्ये रितसर तक्रार नोंदवणार असून परवा पेंद्रातील विविध तीन यंत्रणांना याबाबतचे 2700 पानांचे पुरावे देणार आहे.
ते म्हणाले, निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात मुश्रीफ यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून 2 कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून 3.85 कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे 3 लाख 78 हजार 340 शेअर्स आहेत. 2003 ते 2014 या काळात मुश्रीफ राज्यात पॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोटÎवधी रुपये मिळाले आहेत.
पेंद्रीय अर्थ मंत्रालयाला पुरावे देणार
हसन मुश्रीफ आणि परिवारांनी सरसेनानी संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहे. हे मी जबाबदारीने सांगत आहे. ठाकरे सरकारची डर्टी इलेव्हन घोटाळÎात राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे दोन मंत्र्यांच्या फाईल तयार होत्या. आज एनसीपीच्या मंत्र्याचा घोटाळा उघड केला. नंतर दुसऱया मंत्र्याचा घोटाळा उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बोगस कंपन्या बनवल्या
सीआरएम सिस्टम प्रा. लि. ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही शेल कंपनी -बोगस आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. यामध्ये बेनामी 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.
कारखान्याच्या नावावर जमा झालेल्या रकमा –
मरुभूमी फायनान्स-15.90 कोटी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सी-35.62 कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडी एलएलपी-4.49 कोटी, नवरत्न असोसिएट्स-4.89 कोटी, रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस-11.85 कोटी, माऊंट पॅपिटल-2. 89 कोटी.