वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कारोना महामारी संकटामुळे देशातील सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या असून याला मुष्टियुद्धक्षेत्रही अपवाद नाही. दरम्यान मुष्टियुद्ध स्पर्धा पुन्हा सुरू होतील त्यावेळी 60 वर्षावरील वयोगटाच्या कोणत्याही व्यक्तीला स्पर्धेच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असे भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनतर्फे सांगण्यात आले.
कोरोनाचा प्रसार संपूर्ण देशात वाढत असल्याने सध्या तरी कोणत्याही क्रीडा स्पर्धा घेतल्या जाणार नाहीत. पण मुष्टियुद्ध स्पर्धा पुन्हा सुरू होतील त्यावेळी त्या स्पर्धा वातानुकूलीत स्टेडियममध्ये घेतल्या जाणार नाहीत. तसेच प्रेक्षकांविना या स्पर्धा घेण्यात येतील. कोरोनाची बाधा 60 वर्षावरील व्यक्तींना लवकर होत असल्याने आरोग्य खात्याच्या आदेशानुसार भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळ या स्पर्धेवेळी 60 वर्षावरील कोणत्याही संबंधीत अधिकाऱयाला प्रवेश देणार नाही, असे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले. यापुढे राष्ट्रीय स्पर्धा भरविताना व्यक्तींच्या संख्येवर निर्बंध राहिल. तसेच बंदीस्त स्टेडियममध्ये सदर स्पर्धा मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत घेतली जाईल. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय युष्टियुद्ध स्पर्धा भरविण्याचा प्रयत्न सुरू आहे.