वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचा लाईट वेल्टरवेट गटातील माजी विश्वविजेता मुष्टीयोद्धा अमिर खानने शुक्रवारी मुष्टीयुद्ध क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली. गेल्या फेब्रुवारीमध्ये त्याने ब्रिटनच्या केल ब्रुकचा पराभव केला होता.
2004 च्या अथेन्स ऑलिंपिक स्पर्धेत ब्रिटनच्या अमिर खानने लाईटवेट गटात रौप्यपदक मिळविले होते. त्याने हे पदक आपल्या वयाच्या 17 व्या वर्षी पटकाविले होते. अमिर खान 2009 साली डब्ल्यूटीएच्या लाईट वेल्टर गटातील जेतेपदाचा बेल्ट पटकाविताना युक्रेनच्या कोटेलनीकचा पराभव केला होता. त्यानंतर त्याने 2011 साली अमेरिकेच्या झेब जुदाचा पराभव करून आयबीएफचा बेल्ट पटकाविला होता. अमिर खान आपल्या वैयक्तिक मुष्टीयुद्ध कारकीर्दीत 40 पैकी 34 लढती जिंकल्या आहेत. 2005 साली अमीर खान वयाच्या 35 व्या वर्षी व्यावसायिक मुष्टीयुद्ध क्षेत्रात प्रवेश केला हाता.