लॉकडाऊन, पाऊस, खाणेपिण्य़ाचे वांदे, कुटूंबियापासून दूर, पोलीस कोरोनाग्रस्त तरीही डय़ुटी चोख
प्रतिनिधी / फोंडा
राज्यभरात सुरू असलेल्या पुनश्च लॉकडाऊन काळात एकीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे, त्याही स्थितीत अपुऱया कर्मचाऱयासह काम करीत असलेल्या फोंडा पोलिसांनी चोख डय़ुटी बजावलेली आहे. लॉकडाऊनच्या दोन दिवसात पावसाने हाहाकार माजवला आहे. अश्या परिस्थितीतही पावसाची तमा न बाळगता फोंडा पोलिसांनी नाकाबंदी करून लॉकडाऊनचे पालन केले आहे. फोंडय़ात सर्व दुकाने, आस्थापने बंद असून कारखान्याशी संबंधित वाहतूक तेवढी सुरू आहे. कोरोनाची धास्ती बहुतेकांनी घेतली असून स्वेच्छेने बंद पाळून लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले आहे.
मागील लॉकडाऊनच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनी महत्वाची मदत प्रंटलाईन वॉरीअर्स म्हणून सेवा बजावणाऱया पोलिसांनी दिली होती. स्वयंसेवक कोरडे यांनी खास फोंडय़ातील पोलिसांना गरमागरम कसाय व इतर खाण्य़ाचे जिन्नस पुरविले होते. नाकाबंदीच्या पाचही ठिकाणी स्वतः भेट देऊन मदत पुरविली होती अशी प्रतिक्रीया काही पोलिसांनी दिली आहे. यावेळी कोरोनाचा झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे सर्वांनी धास्ती घेतलेली आहे. लॉकडाऊनच्या दोन दिवसांच्या काळात पाऊसाने अक्षरशः झोडपून काढल्याने स्वयंसेवकांना बाहेर पडणेही अवघड झाले आहे.
या खेपेला फोंडा तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. फेंडा तिस्क, फर्मागुडी व दत्तगड बेतोडा या ठिकाणी दिवसरात्र नाकाबंदी करण्यात येत आहे. तसेच दादा वैद्य चौकात दिवसा नाकाबंदी करण्यात येत असून पावसाची तमा न बाळगता वाहतूक पोलीस व पोलीस स्थानकाचे कर्मचारी डय़ुटी बजावत आहे. बेतोडा येथे नाकाबंदीस्थळी निवारा शेडही उपलब्ध झालेली नाही. पाऊस नव्हता तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे निवारा शेडची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र यावेळी पावसांच्या काळात नितांत गरज असताना निवारा शेड उपलब्ध नाही. तसेच खाण्यापिण्य़ाचे हाल, अपुरे कर्मचारी, पोलिसांना कोरोनाने ग्रासल्याने गेले कित्येक दिवस कुटूंबाचे दर्शनही झालेले नाही. याही परिस्थितीत अपुऱया सोयीसह फोंडा पोलीस डय़ुटी बजावीत आहे. संबंधित सरकारी यंत्रणेने याकामी लक्ष घालून पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी सुविधा पुरवाव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.