वृत्तसंस्था/ गयाना
यजमान विंडीज आणि पाकिस्तान यांच्यातील रविवारचा टी-20 मालिकेतील तिसरा सामना मुसळधार पावसामुळे वाया गेला. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे या सामन्यात केवळ सहा मिनिटांचा खेळ झाला आणि या कालावधीत विंडीजने बिनबाद 15 धावा जमविल्या होत्या.
पंचांनी काही वेळ वाट पाहिली आणि पाऊस कमी होत नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी मैदान आणि खेळपट्टीचे निरीक्षण करून हा तिसरा सामना रद्द झाल्याचे जाहीर केले. चार सामन्यांच्या या मालिकेतील आतापर्यंत दोन सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. आता या मालिकेतील एकमेव सामना बाकी आहे. तिसऱया सामन्यात केवळ आठ चेंडू टाकले गेले. विंडीजच्या सलामीच्या फ्लेचरने 2 षटकार खेचले. या मालिकेत पाकने 1-0 अशी आघाडी यापूर्वी घेतली आहे.