पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हुगळी येथील सभेत सांप्रदायिक आधारावर मतदारांना आवाहन केले होते. याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
प्रचारसभेत मुस्लीम मतदारांना त्यांचे मत विविध पक्षांमध्ये विभागू देऊ नका असे ममतांनी सांगितले होते.
10 कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या तरीही मला कुठलाच फरक पडत नाही. मी सर्वांना एकजूट होऊन मतदान करण्यास सांगत आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात किती तक्रारींची नोंद झाली असे प्रश्नार्थक विधान ममतांनी केले आहे.
, ते प्रत्येक दिवशी हिंदू-मुस्लीम करत असतात अशी प्रतिक्रिया ममतांनी व्यक्त केली आहे.
नंदीग्रामच्या मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणाऱया लोकांच्या विरोधात किती तक्रारी नोंद झाल्या? मी हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि आदिवासींसोबत असल्याचे उद्गार ममतांनी काढले आहेत.