रसोलापुर/संवाद प्रतिनिधी :
सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान रमजान महिन्यास सुरुवात होत असून मुस्लिम बांधवांनी रमजानच्या महिन्यात घरातच नमाज अदा करावी व रोजाही घरात सोडावा. विनाकारण बाहेर पडू नये. प्रशासनास सहकार्य करावे असे, आवाहन शहर काझी सय्यद अमजद अली निझामी यांनी केले आहे.
मुस्लिम धर्माचा पवित्र सण रमजान असून मुस्लिम बांधव एक महिना निरंकार राहून उपवास करीत असतात. दरम्यान सध्या देशासह जगभरात कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रमजानच्या महिन्यातील नमाज घरातच अदा करावी, विनाकारण बाहेर पडू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, रोजा घरातच सोडा, गरीब होतकरू, शेजारी, पाहुणे, गरजवंतांना जकात देऊन मदत करा असेही आवाहान शहर काझी यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.