सांगली/प्रतिनिधी
शिवप्रतिष्ठानच्या वतीने गेले महिनाभर सुरु असलेल्या बलिदान मासाची सांगता आज शुक्रवार १ एप्रिल रोजी मूकपदयात्रेद्वारे करण्यात आली. याप्रसंगी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.
सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शिवभक्त माघ अमावस्या ते फाल्गुनी अमावस्या है तीस दिवस संभाजी महाराजांच्या दिव्य बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी बलिदान मास म्हणून पाळतात. इतिहास काळात संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणून फाल्गुनी अमावस्येला या मूकपदयात्रेचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने मारुती चौक येथे पोलिस निरिक्षक अजय सिंदकर यांच्याहस्ते सकाळी साडेसात वाजता धर्मवीर ज्वालेचे प्रज्ज्वलन करुन व प्रेरणा मंत्र म्हणून या मूकपद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून ही मूक पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी माजी आम. नितीन शिंदे, नगरसेविका स्वाती बेलवलकर, नगरसेवक सुब्राव मद्रासी, अध्यक्ष अविनाश सावंत हणमंत पवार, अंकुश जाधव, अमित करमुसे, नितीन काळे, राजेंद्र शहापुरे, शुभम चव्हाण, बापू हरिदास, सुरज कोळी, शिवाजी शिंदे, राहुल बोळाज, प्रताप बाणकर मंगेश तांदळे, शितल नागे, राजू पुजारी, अमित चव्हाण, नितेश शेलार, किशोर पाटील, तसेच सर्व शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी, धारकरी यांच्यासह अनेक युवती महिलांची संख्या लक्षणीय उपस्थिती होती.