कोलकाता
येथील प्रेसिडेन्सी तुरुंगात कैद इस्लामिक स्टेट दहशतवादी अबू मूसाने सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशावर मंगळवारी हल्ला केला आहे. दहशतवादी मूसाने सुनावणीदरम्यान न्यायाधीशावर चप्पल फेकली आहे. या घटनेनंतर त्याला तुरुंगाच्या विशेष कोठडीत डांबण्यात आले असून पुढील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे होणार आहे.
पश्चिम बंगालच्या वर्धमानमध्ये स्फोट घडविल्याचा आरोप मूसावर आहे. इस्लामिक स्टेट या r संघटनेच्या संपर्कात राहिल्याचे तसेच भारतात दहशतवाद्यांची भरती केल्याचे मूसाने चौकशीदरम्यान मान्य केले होते. प्राथमिक तपासानंतर हे प्रकरण एनआयएला सोपविण्यात आले होते. मूसाला यापूर्वी अलीपूर तुरुंगात डांबण्यात आले होते. पण त्याने तेथेही तुरुंगाच्या मुख्य वॉर्डनवर हल्ला केला होता. या घटनेनंतर त्याला प्रेसिडेन्सी तुरुंगात हलविण्यात आले होते.