ढगाळ वातावरणासह तुरळक पाऊस
प्रतिनिधी/ बेळगाव
मृग नक्षत्र म्हणजे त्या दिवसापासून संततधार पावसाला सुरुवात होते. मृग म्हणजे मिरग असे ग्रामीण भाषेत म्हटले जाते. 7 जूनला मिरगाला सुरुवात होणार असे जुने शेतकरी म्हणतात. मात्र, गेल्या चार दिवसांपासून केवळ ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होताना दिसत आहे. त्यामुळे मृग नक्षत्रामध्ये पावसाचे प्रमाण यावषी कमी असल्याचे बोलले जात आहे.
हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, मध्यंतरी झालेल्या वळीव व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मृग नक्षत्रापूर्वीच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मृग नक्षत्रात पाऊस कमी पडणार अशी शक्मयता होती. त्यानुसार सध्या तरी पावसाने बऱयापैकी उघडीप दिली आहे. त्यामुळे बळीराजा पेरणीबरोबरच भात शिवारामध्ये कोळपणीचे काम करताना दिसत आहे. आतापर्यंत केवळ 30 ते 40 टक्केच पेरणी पूर्ण झाली आहे.
रोहिणीनंतर मृग नक्षत्राला सुरुवात होते. यावर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडेल, अशी शक्मयता होती. मात्र, सध्या तरी पावसाला जोर नसल्याचे दिसून येत आहे. सकाळ व संध्याकाळ पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. पण पावसाला अजून म्हणावा तसा जोर नाही.
यावषी वळीव पावसाला मार्च महिन्यापासूनच सुरुवात झाली होती. त्यानंतर मे महिन्यामध्ये तरी सलग 8 ते 10 दिवस दमदार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱयांनी शिवारातील कामे पूर्ण करून पेरणीला सुरुवात केली. बेळगाव व खानापूर तालुक्मयातील अनेक गावांमध्ये भातपेरणी जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आता भाताची उगवण झाली असून त्यामध्ये कोळपणीची कामे सुरू आहेत.
इतर तालुक्मयांमध्ये अजूनही भातपेरणी बाकी असून सोयाबिन, मूग, मका, बाजरी, जोंधळा, कापूस यांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या बळीराजा पेरणीच्या कामामध्ये गुंतला आहे. उघडीप दिल्यामुळे शेतकऱयांना काम करणेही सोपे जात आहे. मात्र, पिकांची उगवण होण्यासाठी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱयांतून व्यक्त होत आहेत.
भात लावणीचे काम उशिराने सुरू होते. शेतकरीही आता मशागतीच्या कामाला सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत. सध्या असलेली जमिनीतील पिके काढून त्यानंतर त्यामध्ये मशागत करून भातलावण करत असतात. त्यासाठी शेतातील असलेली पिके काढण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे. सध्या असलेली मका, जोंधळा, भाजीपाला ही पिके काढून त्यामध्ये मशागत करण्यासाठी प्रयत्न करताना शेतकरी दिसत आहेत.