जवान वासुदेव हळदणकर यांना शोकाकूल वातावरणात मुख्यालयात श्रद्धांजली
प्रतिनिधी/ म्हापसा
दोनापावला येथे कारला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास दिल्यावर दलाचे अधिकारी वासुदेव हळदणकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. आग विझवून परतताना लिडींग फायरमन वासुदेव हळदणकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते तेथेच खाली कोसळले. आणि त्यांचे निधन झाल्याची दुदैवी घटना दोनापावल येथे आज बुधवारी घडली. त्वरित घटनेची माहिती 108 ला देण्यात आली खरी मात्र रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्याने आमदार जेनिफर मोन्सेरात स्वतः आपल्या खासगी गाडीने हळदणकर यांना धावपळ करीत गोमॅकोत घेऊन गेल्या. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डय़ुटीवरील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्वरित घटनेची माहिती 108 ला देण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दोनापावला येथे कारला आग लागल्याची माहिती अग्निशमन मुख्यालयात दिल्यावर डय़ुटीवरील लिडींग फायरमन वासुदेव हळदणकर यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी गेले. व कारला लागलेली आग आटोक्यात आणली.
आग आटोक्यात आणल्यानंतर परतताना अचानक वासुदेव यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि ते खाली कोसळले. उपस्थित जवानांनी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती त्वरित 108 रुग्णवाहिकेला देण्यात आली मात्र ती येण्यास उशीर झाल्याने त्याच दरम्यान आमदार जेनिफर मोन्सेरात त्या ठिकाणी आल्या व विचारणी केली असता हळदणकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिल्यावर कोणताही विलंब न करता त्यांना त्वरित हळदणकर यांना आपल्या खासगी गाडीने स्वतः चालवत गोमॅकोत नेले. मात्र तेथील डॉक्टरांना हळदणकर यांना मृत घोषित केले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे घटनास्थळी निधन झाल्याची माहिती डय़ुटीवरील डॉक्टरांनी दिली. सर्व सोपस्कार पूर्ण होईपर्यंत आमदार जेनिफर मोन्सेरात त्या ठिकाणी राहिल्या. इतकेच नव्हे तर सर्व सोपस्कार करून अग्निशमन दलाच्या मुख्यालयात येऊन पुष्पचक्र घालून मयत हळदणकर यांना श्रद्धांजली वाहिली. व त्यांच्या अपघाती मृत्यूबाबत दुःख व्यक्त करून हे दुःख त्यांच्या कुटुंबियांना झेलण्याची ईश्वर शक्ती देवो अशी श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांनी वासुदेव हळदणकर यांच्या अकाली निधनाबद्दल शॉक व्यक्त करीत आम्ही एका कर्तबगार व कष्टाळू जवानाला मुकलो असल्याचे म्हटले आहे. हळदणकर हे एक चांगले धडाडीचे जवान होते. व कामात सदैव अग्रेसर होते. असे त्यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले. दरम्यान दलाचे अधिकारी राजन हळदणकर, बॉस्को फेर्राव आदींनी श्रद्धांजली वाहताना या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
यावेळी तालिगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी राजन हळदणकर, प्रशासकीय उपसंचालक आलेक्स वाझ, जॉन, म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव, मुख्यालयातील दिपक सावंत, हवालदार दिलीप गावस, रवी नाईक, पणजी मुख्यालयातील अधिकारी कृष्णा पर्रीकर, निलेश फर्नांडिस यांनी वासुदेव हळदणकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.