इस्रायलमधील तज्ञ चकीत
इस्रायलमध्ये पुरातत्व तज्ञांना ‘मृत्यूच्या गुहे’तून 6000 वर्षे जुना मुलीचा सांगाडा मिळाला आहे. ही मृत्यूची गुहा इस्रायलच्या जुदेआन वाळवंटात मृत सागराला लागून आहे. 1960 च्या दशकात सुमारे 40 मानवी सांगाडे मिळाल्यावर या गुहेचे नाव ‘मृत्यूची गुहा’ ठेवण्यात आले होते. संशोधकांन मुलीचा हा सांगाडा गुहेच्या शुष्क वातावरणात नैसर्गिक स्वरुपात ममीमध्ये रुपांतरित झालेला आढळून आला आहे.
या सांगाडय़ापर्यंत दोरखंडाच्या मदतीने चढूनच पोहोचता येते. सांगाडय़ाच्या सीटी स्कॅनद्वारे ही मुलगी 6 ते 12 वर्षांची होती असे आढळून आले आहे. मृत मुलीचे कातडे आणि केस 6000 वर्षे उलटल्यावरही आंशिक स्वरुपात शिल्लक राहिले आहेत.
हिब्रू भाषेतील सूची पत्र
मृत मुलीच्या हातात काही कपडेही बांधण्यात आले होते. हा सांगाडा मृत समुद्रातील सूची पत्रानजीक आढळला आहे. हे सूची पत्र हिब्रू भाषेत लिहिलेले सर्वात प्राचीन अक्षर आहे. अलिकडेच येथून 2000 वर्षांपूर्वीचे सूची पत्र मिळाले होते. हिब्रूत लिहिण्यात आलेल्या या सूची पत्राला रोमविरोधातील ज्यूंच्या बंडादरम्यान लपविण्यात आले होते.
जगातील सर्वात जुनी टोपली
या भागातून जगातील सर्वात जुनी टोपली मिळाली होती, जी 10 वर्षे जुनी आहे. याचबरोबर येथून नाणी मिळाली होती, जी कोचबा क्रांतीच्या काळातील असल्याचे मानण्यात येते. येथे लूट होण्याचे प्रकार घडल्यावर 2017 मध्ये इस्रायलच्या अधिकाऱयांनी उत्खनन सुरू केले होते.